'आमदनी अठन्‍नी खर्च रुपया' मनपाची आर्थिक घडी विस्कटली, प्रशासन नियोजन करण्यात अपयशी

Foto

औरंगाबाद महानगरपालिकेचा कारभार गेल्या काही वर्षापासून ढेपाळला आहे. विशेषतः प्रशासनाला आर्थिक घडी बसविण्यात अपयश आले आहे. मनपाचा कारभार म्हणजे मआमदनी अठन्नी खर्च रुपयाफ या म्हणीप्रमाणे झाली आहे. आर्थिक नियोजन कोलमडण्याचा फटका नागरिकांना बसत आहे. जलसंपदा खात्याने नोटीस देऊन ही थकबाकी न भरल्याने जायकवाडी येथील मनपाचा पंप हाऊस सिल केला. मनपाच्या गलथानपणामुळे पंप हाऊस सिल करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली. 

 

महानगरपालिकेच्या कारभाराची चर्चा दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने सुरु असते. मनपा प्रशासनातील अधिकारी आणि पदाधिकारी जेथे सोयीचे होईल तेथेच काम करतांना दिसतात. शहर विकासाच्या नावाखाली ही मंडळी स्वतःचे चांगभले करुन घेत आहेत. शहरातील रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, पथदिवे याकडे लक्ष देण्याऐवजी स्मारके, पुतळे, कचरा उचलण्याच्या नावाने नको ती अनावश्यक यंत्र सामु्रगी खरेदी करण्यावर भर देत आहे. लोकप्रतिनिधींसाठी दर दोन-तीन वर्षांनी लाखो रुपये खर्च करुन नवीन वाहने खरेदी करीत आहेत. शासनाने मनपाला भूमिगत गटार योजनेसाठी साडे चारशे कोटी रुपये दिले. पण त्याचे काम अर्धवट स्थितीत आहे. शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. असे असतांना चांगल्या रस्त्यावर काम करण्याच्या निविदा काढण्यावर भर देण्यात येत आहे. क्रांतीचौक ते रेल्वे स्टेशन रोडचे दोन वर्षापूर्वी 30 कोटी रुपये खर्च काँक्रिटीकरण केले. पुन्हा याच रस्त्याचे सौंदर्यीकरण करण्यासाठी 39 कोटीचा प्रस्ताव तयार केला आहे. मनपाच्या या अजब कारभारामुळे शहरात उलट-सुलट चर्चा सुरु आहे. अनावश्यक कामांवर दरवर्षी कोट्यावधीचा खर्च केला जातो. अनेक पदाधिकार्‍यांचे नातेवाईक पालिकेत कंत्राटदारी करतात. अनेक अधिकार्‍यांचे नातेवाईकही कंत्राटदारी करतात. ही सर्व मंडळी आपल्या हिताचे निर्णय घेतात. त्यामुळे मनपा डबघाईला आली आहे.  

 

पंप हाऊस सिल केल्याने नामुष्की-

 

जायकवाडी धरणातून मनपा शहरासाठी पाणी घेते. त्याचा मोबदला जलसंपदा खात्याला द्यावा लागतो. पण गेल्या काही वर्षांपासून मनपाने जलसंपदाला रक्‍कम दिलीच नाही. आज आठ कोटी रुपयांची थकबाकी मनपाकडे आहे. त्यामुळे जलसंपदाने नोटीस देऊन ही मनपा प्रशासन झोपी गेले. त्यांनी न थकबाकी भरली ना त्यांच्याशी चर्चा केली नाही. त्यामुळे गुरुवारी जलसंपदाने पंपहाऊस ज्ञसील केला. त्यानंतर सायंकाळी 50 लाख रुपये भरले. त्याचा फटका शहरवासीयांना बसला. शहरात कालपासून पाणी आले नाही. आज दुपारनंतर पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.